नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमधील गाजीपूर परिसरात कच-याचा ढिग कोसळून अपघात घडला आहे. हा कचऱ्याचा ढिग रस्त्यावर आल्याने काही गाड्या अडकल्याची भीती वर्तविण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुक्रवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. कचऱ्याचा ढिग कोसळून रस्त्यावर आला आणि त्यामुळे काही गाड्या रस्त्याच्या कडेला असलेल्या कालव्यात पडल्या.


कालव्यात पडलेल्या गाड्यांमध्ये एक स्विफ्ट कार, एक टॅक्सी, दोन बाईक्स आणि एक स्कूटीचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर, या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


मृतकांमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं वृत्त समोर येत आहे. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य वेगाने सुरु करण्यात आलं आहे. कचऱ्याचा ढिगाऱ्याऱ्याखाली आणखी काही लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. चार जणांना ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.


दुर्घटनेत जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कचऱ्याचा ढिग कोसळल्यानंतर जोरदार आवाज झाला. हा आवाज इतका मोठा होता की, सर्वांनाच धक्का बसला.