LPG Cylinder Price : वाढत्या महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. घरगुती गॅस सिलिंडरसाठी (Gas Cylinders Price) सध्या ग्राहकांना जवळपास 800 हून जास्त पैसे मोजावे लागत आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आता ग्राहकांना यामधून थोडाफार दिलासा मिळू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कारण पेटीएमने एक जबरदस्त ऑफर आणली असून यामध्ये ग्राहकांना 1000 रुपये स्वस्त दराने गॅस सिलिंडर मिळणार आहे. पेटीएमद्वारे पहिले गॅस सिलेंडर बुक केला तर तुम्हाला 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. आपण पैसे देताच आपल्याला एक स्क्रॅच कार्ड जारी होणार आहे.    


बुकिंग कसे करावे


सरकारी तेल कंपन्यांच्या कस्टमर केअरला फोन करून तुम्ही तुमचा सिलिंडर (LPG Cylinder Booking)  बुक करू शकता. त्याचबरोबर तुम्ही ऑनलाइन सिलेंडर देखील बुक करू शकता.


वाचा : रेल्वे प्रवाशांच्या कामाची बातमी, प्लॅटफॉर्म तिकिटानेही करता येतो प्रवास!


हा प्रोमोकोड वापरा


पेटीएमवर 4 कॅशबॅक ऑफरचा असून  5 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल. यासाठी प्रोमो कोड GAS1000 वापरू शकता. यामध्ये ग्राहकांना जास्तीत जास्त 1000 रुपये आणि किमान 5 रुपये कॅशबॅक मिळेल.


जाणून घ्या, कसा घ्यायचा 'या' ऑफरचा लाभ 


  • सर्वप्रथम Paytm App डाऊनलोड करा. त्यानंतर लॉगिन करा. 

  • बुक गॅस सिलेंडर (Book Gas Cylinder) या पर्यायावर क्लिक करा.

  • भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन गॅसमधील तुमच्या गॅसचा पर्याय निवडा

  • रजिस्टर मोबाईल नंबरवर आपला LPG ID भरा.

  • Proceed च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • त्यानंतर Apply Promocode वर क्लिक करावे लागेल.

  •  येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

  • प्रोमोकोड टाकल्यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि कॅशबॅक मिळेल.