कोल्हापूर : कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक करण्यात आलीय. परशुराम वाघमारे असं या आरोपीचं नाव असून त्याला महाराष्ट्रातून अटक करण्यात आलीय. कर्नाटक एसआयटीनं ही कारवाई केलीय. वाघमारेनंच गौरी लंकेश यांच्यावर गोळी झाडल्याचा दावा कर्नाटक एसआयटीनं न्यायालयात केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परशुराम वाघमारे हा  विजापूर जिल्ह्यातील सिंधगीचा रहिवासी आहे. कालच लंकेश यांच्या हत्येप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. तसंच यापूर्वी नवीन कुमारला अटक केली असून त्यानं हत्येची कबुली दिलीय. हिंदू जनजागृती समितीच्या मोहन गौडावरही आरोप ठेवण्यात आले आहेत.