India Richest Person : गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारातील घसरणीचा फायदा अदानी समुहाचे (Adani Group) मालक गौतम अदानी (Gautam Adani) यांना झाला आहे. गौतम अदानी यांनी कमाईच्या बाबतीत रिलायन्स समुहाचे (Realiance Industries) मालक मुकेश अंबानींना (Mukesh Ambani) मागे टाकलं आहे. रिलायन्सच्या समभागांमध्ये मोठ्या घसरणीमुळे गौतम अदानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फोर्ब्सच्या रिअल टाइम नेट वर्थ डेटानुसार (forbes real time billionaires list), अदानी यांची मालमत्ता सध्या सुमारे 6.72 लाख कोटी रुपये आहे. तर मुकेश अंबानी यांची संपत्ती 6.71 लाख कोटी रुपये आहे. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतही गौतम अदानी हे मुकेश अंबानींच्या एक पाऊल पुढे आहेत. या यादीत अदानी ११ क्रमांकावर आहेत. तर मुकेश अंबानी १२ स्थानावर आहेत.


31 डिसेंबर 2021 पर्यंत अदानींची मालमत्ता 5.82 लाख कोटी रुपये होती. 18 जानेवारीला ती वाढून 6.95 लाख कोटी रुपये झाली होती. म्हणजेच अदानींच्या एकूण मालमत्तेत दररोज 6000 कोटी रुपयांची वाढ होत आहे.


रिलायन्स समुहाचे शेअर्स गेल्या दोन दिवसांत 155 रुपयांनी घसरले. याचा मुकेश अंबांनी यांना मोठा तोटा झाला. गेल्या दोन दिवसात त्यांची संपत्ती ५२ हजार कोटी रुपयांनी घसरली.