Gautam Adani IPO : भारतीय उद्योगपती गौतम अदानी लवकरच आपल्या Adani Capital या कंपनीतून एक नवा IPO आणणार आहेत. हा IPO ते 2024 पर्यंत म्हणजे पुढील दोन वर्षातच आणणार असल्याची शक्यता आहे. या नव्या IPO तून 188 मिलियन डॉलर्स म्हणजेच 1500 करोड रूपयांची उभारणी करण्याची योजना आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Adani Capital चे managing director आणि chief executive officer गौरव गुप्ता यांनी सांगितले की, ''या IPO मार्फत 2 अब्ज डॉलरच्या valuation चे टार्गेट ठेवले गेले आहे.'' त्यांच्या मते जेव्हा कोणतीही कंपनी लिस्ट होते तेव्हा त्या कंपनीचे capital वाढवण्यास मदत होते. 


Adani Capital ही शेतकऱ्यांना आणि गरीब घरातील मुलामुलींनी कर्ज देते. खासकरून देशाच्या financial sector मध्ये ज्यांची हिस्सा फार कमी आहे अशांना Adani Capital ही लोन देते. टेक्नॉलॉजीच्या मदतीने कंपनीला आपला मार्केटमधील विस्तार हा वाढवायचा आहे. Adani Capital चा 30 हजार पासून 30 लाख रुपयांपर्यंत लोन देण्याचा उद्देश आहे. 


Adani Capital ची सुरुवात 2017 मध्ये होती. कंपनीचे 31 मार्च 2021 रोजी जवळजवळ 16.3 करोड रुपये इतके उत्पन्न होते. कंपनीची आठ राज्यांमध्ये 154 शाखा आहेत आणि जवळपास 60,000 कर्मचारी या कंपनीत काम करतात. आत्तापर्यंत कंपनीने 3000 करोड रुपयांपर्यंत लोकांना लोन देऊ केले आहे.