Adani Enterprises calls off its FPO : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. मोदी सरकारच्या बजेटच्या (Budget 2023) दिवशी त्यांना अजून एक झटका बसला. आशिया आणि भारतीतील श्रीमंताच्या यादीतून त्यांची घसरगुंडी झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी अदानी यांना मागे टाकलं. तरदुसरीकडे हिंडेनबर्गचा अहवालनंतर (Hindenburg Report) त्यांचा कंपनीचे शेअर दिवसेंदिवस घसरत चालले आहेत. त्यामुळे अदानी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. अदानी एंटरप्रायझेसने 20 हजार कोटींचा एफपीओ मागे (Adani Enterprises FPO) घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.



गुंतवणूकदारांच्या पैशांचं काय होणार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदानी यांचा निर्णयानंतर गुंतवणूकद टेन्शनमध्ये आले आहेत. पण अदानी एंटरप्रायझेसने जारी केलेल्या निवेदनात असं म्हटलं आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 20,000 कोटी रुपयांचे एफपीओ न आणण्याचा निर्णय ग्राहकांच्या हितासाठी घेतला. (Gautam Adani company big decision after the budget 20 thousand crores FPO cancellation What will happen to investors money in marathi news)




शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, 20,000 कोटी रुपयांच्या FPO ला मंगळवारी इश्यूच्या शेवटच्या दिवशी काही सहकारी उद्योगपतींच्या कौटुंबिक कंपन्यांसह आणि किरकोळ गुंतवणूकदार नसलेल्या गुंतवणूकदारांकडून पाठिंबा मिळाला. अदानी समुहाच्या शेअर्समध्ये मंगळवारी तब्बल 28 टक्क्यांची घसरण झाली. 


काय होती ऑफर? 


गुंतवरणूकदारांना काळजी करण्याची गरज नाही. अदानी कंपनीने जाहीर केलं आहे की, ज्या गुंतवणूकदारांनी या एफपीओमध्ये पैसे गुंतवले होते त्यांना ते परत केले जाणार आहेत. शेअर बाजारातून मिळालेल्या आकडेवारीनुसार, एफपीओ अंतर्गत केलेल्या 4.55 कोटी समभागांच्या ऑफरच्या तुलनेत गुंतवणूकदारांकडून 4.62 कोटी समभागांची मागणी करण्यात आली होती. बीएसईच्या आकडेवारीनुसार, गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या 96.16 लाख शेअर्सच्या तिप्पट शेअर्ससाठी बोली लावली.