Gautam Adani Income : हिंडनबर्ग प्रकरणामुळे प्रसिद्ध उद्योगपती आणि अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी श्रीमंतांच्या यादीतून बाहेर फेकले गेले होते. अदानी यांनी पुन्हा एकदा श्रीमंतांच्या यादीत आपले स्थान मिळवले आहे. अदानी यांनी एका दिवसात कमावले 5,41,45,32,50,000 रुपये कमावले आहेत. यामुळे अदानी यांच्या नेटवर्थमध्ये वाढ झाली आहे. शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे शेअर्स तेजीत आहेत. 


अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अदानी समुहाचे सर्वेसर्वा उद्योजक गौतम अदानी यांनी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. फोर्ब्सने जारी केलेल्या नव्या यादीमध्ये देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर या यादीमध्ये अदानींने आठ स्थानांची झेप घेत दुसरे स्थान पटकावले आहे. फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार 62 वर्षीय मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती अंदाजे 3 लाख 70 हजार कोटी इतकी आहे. तर दुसऱ्या स्थानी असणाऱ्या अदानी यांची संपत्ती अंदाजे 1 लाख 15 हजार कोटी इतकी आहे.


हिंडेनबर्ग प्रकरणानंतर प्रथमच अदानी यांच्या संपत्तीत वाढ


24 जानेवारीला हिंडेनबर्ग रिपोर्ट प्रसिद्ध झाला. यानंतर अदानी यांच्या अदानी ग्रुपच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स गडगडले. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर गौतम अदानी यांना  7 लाख कोटींचा जोरदार फटका  बसला. एवढंच नाही अब्जाधिशांच्या टॉप टेन यादीतूनही गौतम अदानी बाहेर पडलेत. हिंडेनबर्ग प्रकरणानंतर प्रथमच अदानी यांच्या संपत्तीत पहिल्यांदाच मोठी वाढ झाली आहे.  ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार अदानी यांची एकूण संपत्ती 66.7 अब्ज डॉलर इतकी झाली आहे.  जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी 19 व्या स्थानावर पोहोचले आहेत.  अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या टिप्पणीमुळे मंगळवारी अदानी समूहाचे शेअर्स वधारले. अदानी टोटल गॅसचे शेअर्स सर्वाधिक 20 टक्क्यांनी वाढले. 


हिंडनबर्गचा रिपोर्ट काय होता?


हिंडेनबर्ग रिसर्चनं अलिकडेच अदानी उद्योगसमुहाबद्दल एक अहवाल दिला. त्यात अदानी गृपनं आकडे कसे फुगवले हे दाखवून दिलं. या अहवालानं गुंतवणूकदारांचा अदानींवरचा विश्वास उडाला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पोर्ट्स अँड सेझ, अदानी टोटल गॅस, अदानी ट्रान्समिशनमध्ये सर्व कंपन्यांचे शेअर्स गडगडले.