Gautam Adani Net Worth: अदानींची मोठी झेप! संपत्तीमध्ये 3,94,76,40,00,00 रूपयांनी वाढ
Gautam Adani Net Worth: हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर, गेल्या महिन्याच्या अपयशानं मोठा फटका बसलेल्या गौतम अदानींच्या शेअर्समध्ये (Gautam Adani Market Cap) आणि मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. त्यामुळे आता अदानींची घसरलेली संपत्ती (Adani) पुन्हा सावरणार का असा प्रश्नही समोर आहे.
Gautam Adani Net Worth: गेल्या महिन्याभरात असा एकही दिवस गेला नसेल की आपण गौतम अदानी (Gautam Adani Shares) आणि हिंडनबर्ग (Hindenberg) ही दोन नावं प्रामुख्यानं ऐकली नसतील. 24-25 जानेवारीपासून हिंडनबर्ग या अमेरिकेतील कंपनीनं दिलेल्या अहवालापासून अदानींची घसरगुंडी होऊ लागली आहे. त्यांच्या संपत्तीत घट झाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीतूनही (Top Rich People) ते बाहेर फेकले गेले. त्यातून त्यांचे शेअर्सही (Gautam Adani Shares) गडगडले. आता अदानींकडे नक्की किती संपत्ती शिल्लक राहिली असेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तेव्हापासून अक्षरक्ष: गौतम अदानींना फटक्यावर फटके बसत आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मोठं आव्हान येऊन ठेपले आहे. आपला विस्तारलेला उद्योग पुन्हा सावरणाऱ्याची तयारी आणि प्रयत्न त्यांच्याकडून केले जात आहेत. त्यातून अदानींच्या वादंगामुळे राजकीय पटलावरही त्याचे पडसाद उमटले आहेत. (Gautam Adani Net Worth hike earns 3,94,76,40,00,00 of rupees in 2 hours says reports increased market cap)
कालच्याच आलेल्या माहितीनुसार, जीक्यूजी पार्टनर्स या कंपनीनं हजारो रूपयांची गुंतवणूक अदानी एन्टरप्राईज (Adani Enterprise), अदानी पोर्ट्स (Adani Ports) आणि अदानी ट्रान्समिशनमध्ये (Adani Transmission) केली आहे. त्यातून आता गेल्या काही दिवसांपासून अदानींना चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अदानी पोर्ट्समध्ये 9.81 टक्के, अंबुजा सिमेंटमध्ये (Ambuja Cement) 5.70 टक्के , एसीसी एडव्हान्समध्ये (Acc Advanced) 5.11 टक्के तर अदानीस ट्रान्समिशन, अदानी ग्रीन एनर्जी (Adani Green Energy) आणि अदानी टोटल गॅस (Adani Total Gas) या सगळ्या कंपन्यांमध्ये 5 टक्क्यांची वाढ झाली आहे.
शेअर मार्केटमध्येही मोठी उसंडी
शेअर मार्केटमध्ये अदानींच्या शेअर्सनं बीएससी सेन्सेक्सवर (BSE Sensex) 899.62 पॉंईट्सवरून 59,808.97 पॉंईट्सवर गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून अदानी समुहाची आर्थिक घडी सावरताना दिसते आहे. मागील महिन्यात शेअर मार्केटमधून (Share Market) अदानींना अक्षरक्ष: मोठा फटाका बसला होता परंतु आता शेअर मार्केटमध्ये अदानींचे शेअर्स (Adani Shares) हे चांगल्या प्रकारे काम करताना दिसते आहेत. समोर आलेल्या रिपोर्टनुसार, अदानींच्या शेअर्सनी 3,94,76,40,00,00 रूपये कमावले आहेत, तेही दोन तासात.
अदानींचा कमबॅक सुफळ ठरणार?
जेक्यूजी (GQG Partners) या कंपनीनं 15,446 रूपयांचे शेअर्स विकत घेतले आहेत. त्यात या कंपनीचे चेअरमन राजीव जैन (Rajiv Jain) यांनी अदानींच्या कंपन्यांना भविष्यकाळातील सर्वात सक्षम कंपनी असल्याचे म्हटले आहे. अदानींच्या शेअर्समध्ये चढ-उतार सुरूच आहेत. त्यातून आता अदानींना पडलेल्या आपल्या संपत्तीवर ही काम करायला सुरूवात केली आहे त्यामुळे अदानींच्या मदतीसाठीही आता गुंतवणूकीच्या दृष्टीनं अनेक कंपन्या सरावल्या आहेत. त्यामुळे आता अदानींची विस्कटलेली घडी ही पुन्हा सावरताना दिसते आहे. त्यामुळे अदानी आता पुन्हा वर जाणार का? पाच दिवसांत अदानींच्या कंपन्यांनी चांगलं काम केल्याचे दिसते आहे. त्याच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली आहे.