Gautam Adani Son Engagement: भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या घऱात पुन्हा एकदा लग्नाची तयारी सुरु झाली आहे. गौतम अदानी यांचा लहान मुलगी जीत अदानीचा (Jeet Adani) नुकताच साखरपुडा (Engagement) झाला आहे. कोणताही गाजावाजा न करता काही मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा साखरपुडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हिरे व्यापाऱ्याच्या मुलीशी जीत अदानी विवाहबंधनात अडकणार आहे. दिवा शाह (Diva Shah) लवकरच अदानी कुटुंबात सून म्हणून प्रवेश करणार आहे. मात्र लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गौतम अदानी यांना दोन मुलं आहे. मोठ्या मुलाचं नाव करण अदानी आहे. तर जीत अदानी हा त्यांचा छोटा मुलगा आहे. जीत अदानीचा जन्म 7 नोव्हेंबर 1997 रोजी झाला असून, त्याने आपलं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं आहे. जीत अदानीने युनिव्हर्सिटी ऑफ पेन्साल्व्हेनियामधून शिक्षण घेतलं आहे. शिक्षणानंतर 2019 मध्ये जीत अदानी पुन्हा भारतात परतला. जीत सध्या आपला मोठा भाऊ आणि वडिलांसोबत कुटंबाचा व्यावसाय सांभाळत आहे. 



जीत अदानी 2019 पासून अदानी समूहाशी जोडला असून, वडिलांना व्यवसायात मदत करत आहे. 2022 मध्ये त्याला अदानी समूहात Vice President म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. 


कोण आहे गौतम अदानींची होणारी सून - 


गौतम अदानी यांचा मुलगा जीत अदानीचा रविवारी 12 मार्च 2023 ला दिवा शाहसोबत साखरपुडा झाला. साखरपुड्यासाठी गुजरातमध्ये एका खासगी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या साखपुड्यासाठी दोन्ही कुटुंबातील जवळचे मित्र आणि नातेवाईक उपस्थित होते. गौतम अदानी यांची होणारी सून दिवा शाह C.Dinesh & Co. Pvt. Ltd चे मालिक जैमिन शाह यांची मुलगी आहे. ते हिरे व्यापारी आहेत.