मुंबई : दररोज लेटेस्ट स्मार्टफोन बाजारात लाँच होत असतात, या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) उत्तम कॅमेरे असतात. मोबाईल खरेदी करताना आपण कॅमेरा किती मेगापिक्सेलचा (Megapixels) आहे, हे नक्कीच तपासत असतो. कॅमेरा जितका मेगापिक्सेल असेल तितकी त्याची फोटो गुणवत्ता चांगली असते. हे सर्व झालं स्मार्टफोनच्या (Smartphone) बाबतीत, पण तुम्हाला तुमचा डोळा किती मेगापिक्सेलचा आहे ? हे माहिती आहे का? नाही ना मग चला तर जाणून घेऊयात. (general knowledge how many megapixels is the human eyes know about it) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोळा किती मेगापिक्सेलचा असतो?
आपल्या डोळ्यात एक लेन्स आहे हे तुम्हाला माहित असेलच, ही लेन्स कोणत्याही काचेची नसून नैसर्गिक आहे. डोळा कॅमेऱ्यासारख्या गोष्टी टिपतो. आपले डोळे शरीरातील सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहेत.जर मानवी डोळा डिजिटल कॅमेरा मानला गेला तर तो 576 मेगापिक्सेलपर्यंत (Megapixels)  दृश्य दाखवतो. म्हणजेच, आपण असे म्हणू शकतो की आपल्या डोळ्यातील लेन्स 576 मेगापिक्सेल आहे.


कॅमेरा सारखं काम करतो?
मानवी डोळा हा कॅमेर्‍याप्रमाणे काम करतो आणि त्यात तीन भाग असतात. पहिले लेन्स किंवा ऑप्टिकल उपकरण जे प्रकाश गोळा करून चित्र बनवते. दुसरा सेन्सर जो इमेजच्या ऑप्टिकल एनर्जीला इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये रूपांतरित करतो आणि तिसरा प्रोसेसर जो त्या इलेक्ट्रिक सिग्नलला परत स्क्रीनवरील इमेजमध्ये रूपांतरित करतो.


डोळा एकावेळी 576 मेगापिक्सेलचे (Megapixels) क्षेत्र पाहू शकतो, परंतु आपला मेंदू एकाच वेळी त्यावर प्रक्रिया करू शकत नाही, तो हाय डेफिनिशनमध्ये फक्त एका लहान भागावर प्रक्रिया करण्यास सक्षम आहे. त्यामुळेच कोणतीही घटना नीट पाहण्यासाठी आपली नजर त्याकडे वळवावी लागते.


वयानुसार मेगापिक्सेलमध्ये बदल होतो? 
दरम्यान अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की वाढत्या वयाचा डोळ्यांच्या क्षमतेवर आणि मेगापिक्सेलवर (Megapixels) परिणाम होतो की नाही? तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की, शरीराच्या इतर भागांप्रमाणेच, वृद्धत्वासोबत डोळ्याची रेटिना देखील कमकुवत होऊ लागते. यामुळे, लोकांच्या पाहण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो आणि डोळ्यांच्या मेगापिक्सेलमध्ये बदल होतो.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)