Viral Video : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक जर्मन महिला (German Woman) बॉलिवूड गाण्यावर (Bollywood Song) डान्स करताना दिसत आहे. तिच्या डान्सचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टांझानियाचा सोशल मीडिया (Social Media) स्टार किली पॉल बॉलिवूड गाण्याचा खुप मोठा दिवाना आहे. किली पॉल प्रमाणेच जर्मनची एक डान्सर देखील बॉलिवूडची खुप मोठी दिवानी आहे. या जर्मन डान्सर महिलेचे (German Woman)नाव नीना वा आहे. नैना ही सोशल मीडियावर तिच्या बॉलिवूड गाण्यावरील (Bollywood Song) डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिचे हे व्हिडिओ प्रेक्षकांना खुप आवडतात. आता असाच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.   


व्हिडिओत काय? 


जर्मनची (German Woman) नीना बॉलिवूड गाण्यावर नेहमीच डान्स करून सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे इन्टाग्राम अकाऊंट पुर्णत बॉलिवूड गाण्यावरील डान्सने भरले आहे. तिच्या या डान्सला नेटकऱ्यांची खुप पसंती असते. इतकेच नाही तर तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये तिने स्वतःला जर्मन बॉलीवूड डान्सर म्हटले आहे.असाच तिने आता बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणौतच्या लंडन ठूमकदा गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या या डान्सची चर्चा आहे.  


जर्मनची (German Woman) नीनाने थेट शेत गाठले होते आणि या शेतात तिने लंडन ठूमकदा गाण्यावर डान्स केला होता. यावेळी तिने साडी नेसून शेतात भन्नाट डान्स केला होता. तिने कंगणा राणौतच्या गाण्यावर जबरदस्त स्टेप्स केल्या आहेत. या स्टेप्स प्रेक्षकांना आवडल्या आहेत. 



दरम्यान जर्मनच्या (German Woman) या नीनाच्या डान्सचे सोशल मीडियावर (Social Media) कौतुक होत आहे. अनेक नेटकरी तिच्या या डान्सच्या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, या रीलची खासियत, तुमची ऊर्जा, तुमची स्टेप्स आणि तुमचा आनंद. आणखी एका युजरने लिहिले, भारतीय साडीत अप्रतिम डान्स. तिसऱ्या य़ुझरने लिहिले की, तुमची भारतीय नृत्याची आवड विलक्षण आहे, तुम्ही आश्चर्यकारक आहात. असे एकापेक्षा एक भन्नाट कमेंट या डान्सच्या व्हिडिओवर येतायत. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.