पोपट पिटेकर, झी मीडिया, मुंबई : जमिनीची कागदपत्रे (Land papers) ही मालमत्तेच्या खरेदी- विक्रीच्या (Buying and selling) व्यवहारात खुप महत्वाची भूमिका बजावतात. गहाळ कागदासह (Missing paper property to sell ) मालमत्ता विकणं हे सोपं काम नाही. जमिनीची कागदपत्रे (Land papers) ही तुमची सर्वात महत्त्वाची कागदपत्रे आहेत. मालमत्तेची कागदपत्रे नसणे तुम्हाला खूप अडचणीत टाकू शकते. जी मालमत्ता वर्षानुवर्षे तुमची मालमत्ता आहे, तुमचे घर (your house) आहे, ती तुमची मालमत्ता असल्याचा कोणताही पुरावा नसणे हा मोठा धक्का आहे. अशा परिस्थितीत त्याची काळजी घेणे ही मोठी जबाबदारी आहे. परंतु जर कोणत्याही परिस्थितीत तुमची जमिनीची कागदपत्रे (Land papers lost) हरवली असतील तर काही बचाव पावले आहेत जी तुम्ही त्वरित उचलली पाहिजेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांकडे गुन्हा दाखल करा
तुमच्या मालमत्तेची जर तुम्हाला कागदपत्रे मिळत नसतील तर तुम्ही यासाठी प्रथम पोलिसांकडे एफआयआर (FIR to police) नोंदवा. यामध्ये तुमच्या मालमत्तेची कागदपत्रे मिळत नसल्याचे सांगा. एफआयआरची एक प्रत तुमच्याकडे ठेवा. लक्षात ठेवा की केवळ मालमत्तेचा मालकच मालमत्तेच्या कागदपत्रांबाबत एफआयआर (FIR) दाखल करू शकतो. काही शहरांमध्ये यासाठी ऑनलाईन एफआयआर (Online FIR) नोंदवण्याची सुविधाही उपलब्ध आहे.


वर्तमानपत्रात नोटीस छापा
एकदा तुम्ही एफआयआर दाखल केल्यानंतर तुम्हाला मालमत्तेची कागदपत्रे हरवल्याबद्दल कोणत्याही प्रादेशिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध (Publish advertisement in newspaper) करावी लागेल. जाहिरातीत तुमच्या संपर्कांची माहिती आणि मालमत्तेचा तपशील (Property details) टाका. जेणे करुन कोणाला आढळल्यास ते तुम्हाला आणून देतील.


शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज करा
तुमच्या एफआयआरच्या आधारे तुम्ही हाऊसिंग सोसायटीकडून शेअर सर्टिफिकेटसाठी अर्ज (Application for share certificate) दाखल करू शकता. तुमच्या अर्जानंतर अधिकृत रेसिडेंट वेल्फेअर असोसिएशन सोसायटीची बैठक बोलावते आणि तुमचा नुकसानीचा पुरावा एफआयआर तपासते. तुमचा अर्ज (Your application) मंजूर झाल्यास, गृहनिर्माण संस्था शुल्क आकारेल आणि त्या बदल्यात तुम्हाला शेअर प्रमाणपत्र (Share Certificate) देईल. तसेच, त्यांच्याकडून NOC ना-हरकत प्रमाणपत्र (No-damage certificate) मागवा कारण ते पुढील व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावते.


डुप्लिकेट विक्री डीड मिळवा
संपत्तीच्या विक्री कराराची डुप्लिकेट प्रत (Duplicate copy of sale agreement) मिळवणे ही अंतिम पायरी आहे. यासाठी तुम्हाला पोलीस तक्रारीच्या प्रती, जाहिरातीचा मजकूर, शेअर सर्टिफिकेट आणि नोटरीने काढलेले हमीपत्र (Notarized Affidavit) या सर्व नोंदी निबंधक कार्यालयात (Office of the Registrar) जमा कराव्या लागतील. कारण मालमत्तेच्या व्यवहारासंबंधीचे सर्व रेकॉर्ड त्या विशिष्ट कार्यालयात ठेवले जातील. त्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल आणि ते विक्री कराराची डुप्लिकेट प्रत जारी करतील.


बँकेतून पेपर गहाळ झाल्यास
जर तुमची कागदपत्रे बँकेत जमा झाली असतील आणि तेथून हरवले (paper is missing from the bank)असतील, तर तुमची प्रॉपर्टी डीड डुप्लिकेट करून घेण्यासाठी संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी पूर्णपणे बँकेची आहे. तुम्ही बँकेकडून नुकसानभरपाईचा (Compensation from Bank) दावा करू शकता. तुमची ओळखपत्रे (Your identity cards) जतन करणे हे बँकेचं कर्तव्य आहे आणि निष्काळजीपणासाठी त्यांना दंड देखील होऊ शकतो.