नवी दिल्ली : आयफोन घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. अॅप्पल आयफोन ७ प्लस १२८ जीबी मॉडेलवर आता ११००० रुपयांची सवलत मिळत आहे. त्याचबरोबर आयफोन ७ प्लस, आयफोन ६ एस वर देखील बंपर सूट आहे. या सुवर्णसंधीचा फायदा घेण्यासाठी तुम्ही पेटीएम अॅप्पचा वापर करू शकता. येथे अनेक आयफोनवर चांगली ऑफर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयफोन ७, १२८ जीबी व्हेरियंटवर ११००० रुपयांची कॅशबॅक ऑफर आहे. या ऑफरमुळे आयफोनचे हे मॉडेल ५८,३९३ रुपयांऐवजी तुम्ही ४७,३९३ रुपयांना खरेदी करू शकाल.  आयफोन ७ च्या ३२ जीबी व्हेरियंटवर ९,१०० रुपयांचे कॅशबॅक आहे. ज्यामुळे हा फोन तुम्हाला ३९,०९९ रुपयांना मिळेल. आयफोन ७ प्लसच्या १२८ व्हेरियंटवर ११५०० रुपयांचे कॅशबॅक मिळेल. ज्यामुळे ७०,६६९ रुपयांचा हा फोन ५९,१६९ रुपयांना मिळेल. अॅप्पल आयफोन ७ च्या ३२ जीबी वर तुम्हाला ११००० रुपये कॅशबॅक मिळतील. त्यामुळे हा फोन ५१,७९९ रुपयांना खरेदी करता येईल. 


आयफोन ६ एस वर ७००० रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे. ज्यामुळे ३२ जीबी व्हेरियंटवर ३२,३४९ रुपयांमध्ये उपलब्ध होईल. अॅप्पल आयफोन ६ च्या ३२ जीबी व्हेरियंट वर ६००० रुपयांचे कॅशबॅक मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांना हा फोन २१,२८५ रुपयांना खरेदी करता येईल.