मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दर केव्हा स्वस्त होईल याची अपेक्षा प्रत्येकाला असते. परंतु स्वस्त होण्याऐवजी दर वाढतच चालले आहेत. पण जर आता तुम्हाला पेट्रोल फ्रीमध्ये मिळालं तर...?


असं मिळवा पेट्रोल फ्री


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही पेट्रोलचं ऑनलाईन पेमेंट केल्यावर तुम्हाला सूट मिळते पण आता तुम्हाला ते फ्री मध्ये मिळणार आहे. मोबिक्विक वॉलेटमधून तुम्ही पेट्रोलचं पेमेंट केलं तर तुम्हाला पूर्ण पैसे परत तुमच्या वॉलेटमध्ये येणार आहे. कंपनी पेट्रोलसाठी खास स्कीम चालवत आहे. संध्याकाळी 6 ते 9 च्या दरम्यान पेट्रोल टाकून त्याचं मोबिक्विकमधून पेमेंट केल्यास सुपरकॅश ऑफर मिळेल. त्यात 100% कॅशबॅक ऑफर मिळणार आहे.


कधीपर्यंत फ्री मिळेल पेट्रोल?


मोबिक्विकची ही ऑफर फक्त पाच दिवस असणार आहे. आता या ऑफरची वैधता फक्त दोन दिवस बाकी आहे. 24 नोव्हेंबर रोजी ही ऑफर समाप्त होईल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला किमान 10 रुपयेचं पेट्रोल भरावं लागेल.


कसा होणार फायदा


ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कोणत्याही कूपन कोडची आवश्यकता नाही. परंतु फक्त पेट्रोल पंपवरच क्यूआर कोड पैसे भरतांना स्कॅन केले जाईल. यानंतर आपण प्रविष्ट केलेल्या पेट्रोलची रक्कम टाका. पण कंपनीने 100 रुपयांपर्यंत कॅशबॅकची मर्यादा लावली आहे. जेव्हा कॅशबॅक येतो तेव्हा आपण तेच पैसे पुन्हा पेट्रोल टाकण्यासाठी कामात येऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला २०० रुपयेच पेट्रोल मिळेल.


कॅशबॅक वगळता सूट


पेट्रोल टाकल्यानंतर तुम्हाला वॉलेटमध्ये कॅशबॅक मिळेलच पण 0.75% ऑनलाइन पेमेंट सवलत देखील मिळेल. हा लाभ आपल्याला पाच दिवसात आपल्या वॉलेटमध्ये जमा केला जाईल. कॅशबॅकसाठी आपल्याला केवळ 24 तास वाट पहावी लागेल.


सुपरकॅश दर आठवड्यात


विशेष ऑफर्सच्या व्यतिरिक्त, मोबिक वॉलेटकडून पेट्रोल-डिझेल पेमेंटसाठी 5% सुपरकॅच ऑफर उपलब्ध आहे. पण यामध्ये 50 रुपयांचं पेट्रोल टाकावं लागेल.