Cold and Heater : थंड पाणी म्हटले की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. तर थंडीत थंड पाण्याचे नावही काही जण घेत नाही. मात्र, छोटे उपकरण तुमची समस्या दूर करेल. हे छोटे उपकरण पाणी गरम करुन देईल. त्यामुळे थंडीतही आंघोळ करण्याचा तुम्हाला कंटाळा येणार नाही. पाणी तापविण्यासाठी अनेक जण गिझरचा वापर करतात. मात्र, आता गिझरपासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला असे उपकरण सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे वीज बिल वाचेल आणि तुम्हाला गिझरसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत. थंडीच्या मोसमात गिझरची सर्वाधिक गरज असते. या मोसमात गिझरचा वापर जास्त करुन गरम पाण्यासाठी केला जातो. थंडी पडताच गिझरच्या किमती वाढतात आणि त्यामुळे वीजही जास्त लागते. घरात 4 ते 5 माणसे असतील तर गिझर बराच वेळ चालू ठेवावा लागतो. गिझरपासून मुक्ती मिळवण्यासाठी आम्ही तुम्हाला असे उपकरण सांगत आहोत, ज्यामुळे तुमचे वीज बिल वाचेल आणि तुम्हाला गfझरसाठी जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.  


वीज बिल फारसे येणार नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक काळ असा होता की गिझर रॉडने पाणी तापवले जात असे. त्यावेळी गिझर इतके लोकप्रिय नव्हते. मात्र रॉडमुळे अनेक अपघातही झालेत. पण आता तंत्रज्ञानात खूप प्रगती झाली आहे. आता सुरक्षित इमर्शन रॉड बाजारात आले आहेत. रॉडला पाण्यात टाकल्यानंतरही विजेचा झटका बसत नाही. हा रॉड आयएसआय ( ISI) मार्कसह येतो आणि सुरक्षा स्तर कोटिंगसह येतो. इमर्शन रॉड 1500W द्वारे वीज वापरली जाते. इमर्शन रॉड वापरुनही वीज बिल फारसे येणार नाही. 


3 मिनिटात पाणी उकळते


या इमर्शन रॉड पाण्याने भरलेली बादली सुमारे 3 ते 4 मिनिटांत गरम करतो. जर तुम्हाला इमर्शन रॉड विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. प्रथम की रॉड आयएसआय मार्कसह येतो आणि चांगल्या कंपनीचा आहे. अगदी ओरिजिनल दिसणाऱ्या अनेक स्थानिक रॉड्सही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑनलाइन किंवा चांगल्या दुकानातून खरेदी करा. तुम्हाला बजाजचा शॉक प्रूफ रॉड 600 ते 500 रुपयांना ऑनलाइन मिळेल.