अंड्यात सापडले प्लास्टिक, व्हिडिओ व्हायरल, प्लॅस्टिकची अंडी ओळखायची कशी? वाचा
Ghaziabad Plastic Egg: अंड्यात प्लास्टिक सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. प्लास्टिकची अंडी ही आरोग्यासाठी घातक असतात.
Ghaziabad Plastic Egg News: भेसळयुक्त अंड हा प्रकार तुम्ही कधी ऐकलाय का?, पण आता दूध, फळे, मिठाईयाबरोबरच अंड्यांमध्येही भेसळ होत असल्याचा दावा केला जात आहे. उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीला अंड्यामध्ये प्लास्टिक आढळून आले आहे. या प्रकरणाची प्रशासनस्तरावर तपास केला जात आहे. मात्र, या आधीही काही राज्यांमध्ये अंड्यांमध्ये प्लास्टिक आढळल्याची प्रकरणे समोर आली होती. अंड्यात प्लास्टिक आहे हे कसं ओळखाल नागरिकांनी जाणून घेण्याची गरज आहे. (plastic eggs how to identify)
गाझियाबादमध्ये सापडले अंड्यांमध्ये प्लास्टिक
गाझियाबाद येथे मोदीनगर येथे राहणारा एक इसम रोज त्याच्या पाळीव कुत्र्याला अंड खायला देत असे. काही दिवसांपूर्वी त्याने त्याच्या परिसरातील एका विक्रेत्याकडून अंड विकत घेतले आणि कुत्र्याला दिले. मात्र, कुत्र्याने तोंड फिरवून घेतले. अनेक प्रयत्न करुनही तो अंड खाण्यास तयार नव्हता. म्हणून त्यांनी पशूचिकित्सकांना बोलवलं. त्यावेळी डॉक्टरांनी अंड्याचे कवच तपासले असता त्यात प्लास्टिकचा थर आढळून आला. या घटनेचा व्हिडिओदेखील व्हायरल होत आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनस्तरावर या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. गाझीयाबाद येथे केमिकल आणि प्लास्टिकचा वापर करुन अंडी तयार करण्यात येतात, अशा बातम्या यापूर्वी चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर आता हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
अंड्यांमधला फरक कसा ओळखाल?
केमिकलयुक्त व प्लास्टिकची अंडी आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. ही अंडी हुबेहुब खऱ्या अंड्यांसारखीच दिसतात. त्यामुळं त्याची गुणवत्ता आपण तपासू शकत नाही. पण काही सोप्या टिप्सने तुन्ही प्लास्टिकच्या अंड्यांमधला फरक ओळखू शकता. खरे अंडे वजनाने जास्त अशते. त्यामुळं तुम्ही ते पाण्यात टाकताच तळाला जाऊन बसते. तर, प्लास्टिक किंवा भेसळ असलेले अंड्यात सिंथेटिक असते त्यामुळं पाण्यात टाकताच ते लर तरंगते.
त्याव्यतिरिक्त नकली अंड्याचे कवच लवकर आग पडकते. त्यात प्लास्टिक असल्याकारणाने लवकर आग भडकते. मात्र, खरे अंड्यांचे कवच लवकर आग पकडत नाही. त्याचबरोबर नकली अंड्याच्या जवळ कधीच माशा घोंगावत नाहीत, असाही दावा केला जातो. तर, ते अंड फोडण्याचा प्रयत्न केल्यास लवकर फुटत नाही. त्यावर जास्त जोर लावाला लागतो. याउलटी अंड्याचे कवच हे खूप सॉफ्ट असतात. या टिप्सने तुम्ही अंड्यांमधला फरक ओळखू शकता.