नवी दिल्ली: तुम्हाला जर अनोळखी व्यक्तीचा Whatsapp कॉल आला तर जरा सावधान. कारण व्हिडीओ कॉलवरून तुम्हाला जाळ्यात अडकवण्याचा कोणाचा प्लॅन तर नाही ना? अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पती-पत्नीने मिळून 500 हून अधिक लोकांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल केल्याची माहिती मिळाली आहे. हा घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाझियाबादमध्ये ब्लॅकमेलिंगच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. त्यांचे न्यूड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या टोळीचा गाझियाबाद पोलिसांनी पर्दाफाश केला. हे रॅकेट बऱ्याच काळापासून सक्रिय होतं. ज्याने 500 हून अधिक लोकांना फसवल्याची माहिती मिळाली होती. 


गुजरातमधून नोंदवण्यात आली तक्रार
राजकोट इथे राहणाऱ्या तुषार नावाचा एक व्यक्ती या हनीट्रॅफमध्ये फसला. ज्याने याची माहिती पोलिसांनापर्यंत पोहोचवली. तुषारने घडलेला सर्व प्रकार राजकोट पोलिसांना सांगितला आणि तक्रार दाखल केली. 


सायबर सेलने दिलेल्या माहितीमधून असंही समोर आलं आहे की, साधारण 500 लोकांचे अश्लील व्हिडीओ बनवून खंडणी मागितली. या रॅकेटच्या माध्यमातून 22 कोटी रुपये वसूल करण्यात आले. या टोळीचे सराईत ठग दाम्पत्य असून, ते राजनगर एक्स्टेंशनच्या ऑफिसर सिटी प्रथममध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन कॉल सेंटर चालवत होते. पोलिसांनी घटनास्थळावरून दाम्पत्य आणि 3 मुलींना अटकही केली आहे.