मुंबई: चपाती किंवा पोळी करण्यासाठी तवा लागतो त्या तव्याला मागे सारत आता 2 मिनिटांत पोळी करण्याचा जुगाड सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यापाठोपाठ आता आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये भलीमोठी रोटी तयार केली जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की रुमालापेक्षाही मोठी ही रोटी दिसत आहे. एवढी मोटी रोटी जर भाजायची असेल तर तवाही अपुरा पडेल त्यासाठी दोन तरुणांनी एक अजब जुगाड शोधला आणि सर्वांनाच आश्चर्यचकीत केलं. या तरुणांनी एवढी मोठी रोटी चक्क एका लोखंडी ड्रमच्या मदतीनं भाजली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by & (@safarismyjam)


या रोटीकडे पाहिल्यानंतर साधारण आपल्याला अंदाज येईल की एका घरातील लोकांचं पोट या रोटीवर भरू शकतं. एवढी मोठी रोटी तयार करून ती लोखंडी ड्रमवर ठेवून भाजली जाते आहे. या व्हिडीओला सोशल मीडियावर काही चांगल्या तर काही वाईट प्रतिक्रिया मिळत आहे.


अनेकांनी ही रोटी किती आरोग्याला हानीकारक असेल असा सवालही उपस्थित केला आहे. तर काहींनी या गजब जुगाडानंतर आश्चर्य व्यक्त केलं.