कटिहार : नुसतं सापाचं नाव जरी एकलं तरी अनेकांचा थरकाप उडतो. मात्र या घटनेत कुटूंब तब्बल 40 सापांसोबत राहत होते. विशेष म्हणजे हे कुटूंब इतक्या सापांसोबत रहात होती,याची कल्पना देखील या कुटुंबाला नव्हती. मात्र कुटूंबियांसोबत एक दुदैवी घटना घडली. या घटनेनंतर इतक्या सापांसोबत हे कुटूंब राहात असल्याचा उलगडा झाला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहारच्या कटिहारमधील करणपूर पंचायतीच्या बिजुरिया गावातील मोहम्मद आफताब यांच्या कुटूंबातील 5 वर्षाच्या निष्पाप मुलीला साप चावल्याची घटना घडली होती. या घटनेत उपचारादरम्यान मुलीचा दुदैवी मृत्यू झाला होता. त्यामुळे आफताब यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला होता.  


मोहम्मद आफताब यांची मुलगी तमन्ना तिच्या मित्रांसोबत घराच्या अंगणात खेळत होती. यादरम्यान तिला सर्पदंश झाला होता. या सर्पदंशामुळे मुलीचा मृत्यू झाल्याने कुटूंबियांना घराच्या आत कुठेतरी साप लपून बसल्याचा संशय होता. त्यानुसार आफताब यांनी सर्पमित्राला साप पकडण्यासाठी बोलावले होते. 



सर्पमित्राला घरात एक दोन नाही तर 40 साप सापडले. सापाचा हा कळप पाहून सर्पमित्रालाही घाम फुटला. तर कुटूंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर सर्पमित्राने अत्यंत सावधगिरीने एक एक करून सर्व विषारी साप पकडले आणि गोण्यांमध्ये बंद केले. यानंतर कुटूंबियांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला.  


दरम्यान वनविभागाला या घटनेची माहिती देत 40 सापांचे कुटुंब त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.