तरुणी जोमात बॉयफ्रेंड कोमात... धडा शिकवण्यासाठी ऑडर केली Online `थप्पड`
एक्सला थोबडावून ये, मुलीची डिलीव्हरी बॉयला ऑनलाईन ऑर्डर, पुढे काय झालं...
मुंबई: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे ऑनलाइन वस्तू खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. समजा आपण आता घरी बसून काहीही ऑर्डर केलं तर घरपोच सेवा आपल्याला मिळते. सोशल मीडिया साइट ट्विटरवर एक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता एक डिलिव्हरी बॉय तरुणाला कानशिलात मारून निघून जात आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की यात काय खास आहे? अहो हे देखील ऑनलाइन मागवण्यात आलं आहे. वाचून एक क्षण तुमचाही गोंधळ उडाला ना?
नेमकं काय आहे प्रकरण?
आत्तापर्यंत आपण ऑनलाइन रेशन, कपडे, शूज आणि घराच्या चप्पल मागवल्या असाव्यात. जर घरात कोणतेही कार्य असेल तर आपण कार्यक्रम व्यवस्थापन कंपनीशी बोलून आपले घर थीमनुसार सजवले असेल. पण एका तरुणानं तर हद्दच केली. तिने तिच्या एक्स बॉयफ्रेंडला धडा शिकवायचं ठरवलं. या तरुणीनं एक्स बॉयफ्रेंडसाठी चक्क 2 खणखणीत कानशिलात देण्याची ऑनलाइन ऑडर केली.
या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक डिलिव्हरी बॉय येऊन तरुणाला दोन थोबाडीत मारून जातो. तरुणाला नेमकं काय ते समजत नाही. डिलिव्हरी बॉय जेव्हा कागदावर त्याची सही घेतो तेव्हा सांगतो हे तुझ्या एक्स गर्लफ्रेंडनं ऑर्डर केलं आहे. खरंतर तिला ठोसा ऑर्डर करायचा होता मात्र बजेटमध्ये बसला नाही म्हणून हे ऑडर केलं आहे. इथे सही करा असं हा डिलिव्हरी बॉय म्हणतो.
हा सगळ्या प्रकार लक्षात येताच चकीत होतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. ही एक कंपनीची जाहिरात असावी असंही या व्हिडीओच्या शेवटी लक्षात येत आहे. आजच्या जगात काहीही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया युझर्सनी दिली आहे.