मुंबई : आपण कधीकधी आपल्या जवळच्या व्यक्तीला मॅसेज करताना विचार नाही करत की आपण काय बोलत आहोत. कधीकधी आपण चटकन बोलून देखील जातो. पण शब्दांचा वापर करत असताना काळजी घेणं आवश्यक असतं. असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळुरूहून एक तरुण मुंबईला जात होता. तर मुलीला बंगळुरूला जायचे होते. दोघेही मित्र होते आणि आपापसात सुरक्षेबाबत गमतीने बोलत होते. यादरम्यान 14B सीटवर बसलेल्या प्रवाशाला दिसले की, 13A सीटवर बसलेल्या मुलाच्या फोनमध्ये 'तू किंवा बॉम्बर' असा संदेश आला. यानंतर या प्रवाशाने क्रू मेंबर्सना याची माहिती दिली.


 कर्नाटकातील मंगळुरूमध्ये हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुलगी आपल्या प्रियकरासोबत चॅट करत होती. पण एका मॅसेजमुळे मुंबईला जाणाऱ्या विमानाला चक्क 6 तास उशीर झाला. एवढेच नाही तर सर्व प्रवाशांना फ्लाइटमधून उतरवण्यात आले, त्यानंतर फ्लाइटमध्ये काही स्फोटक आहे का, याची चौकशी करण्यात आली.


रविवारी हा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी या दोघांची अनेक तास चौकशी केली. मुलीलाही बंगळुरूला जाता आले नाही. दुसरीकडे, विमान आणि सर्व 185 प्रवाशांच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. यानंतर सायंकाळी 5 वाजता विमान मुंबईकडे रवाना झाले.