Couple Kiss Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी की काय पण आजची तरुणी पिढी जीवाची पर्वा न करता अनेक धक्कादायक स्टंट करताना दिसून येतं आहे. स्वत:सोबतच इतरांचाही जीव हे लोक धोक्यात घालतात. सोशल मीडियामुळे प्रेम व्यक्त करण्याचा नवीनच ट्रेंड पाहिला मिळतं आहे. या वर्षांची सुरुवात बाइकवर खुल्लम खुल्ला प्रेम करताना कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग काय बघता बघता असे अनेक व्हिडीओ गेल्या काही दिवसांमध्ये समोर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाहतूक नियमाचं उल्लघंन केल्याप्रकरणी पोलिसांनी अशा बाइकस्वारांवर कारवाईही केली. मात्र पोलिसांचा धाक या प्रेमी युगुलांवर दिसून येत नाही आहे. पुन्हा एकदा गर्दळ अंधारात धावत्या स्कूटीवर प्रेम करणारे कपल दिसून आले आहेत. 


प्रेम करण्याची ही कुठली तऱ्हा?


तो तरुण स्कूटी चालवत असताना त्याची गर्लफ्रेंड समोरच्या बाजूने त्याच्या मांडीवर बसली होती. तो गाडी चालवत होता आणि ती त्याला मिठी मारुन बसली होती. अधून मधून ती त्याल किस करतानाही या व्हिडीओमध्ये दिसत आहे. 


हा व्हिडीओ कुठला आहे ?


हे जोडपे बिलासपूरमधील आहे. रात्री दोनच्या सुमारास हे कपल बिलासपूरमधील रघुराज स्टेडियमच्या मागून इमलीपारा रोडवरुन अखेर जुन्या बसस्थाकाकडे गेले. त्यानंतर शिव टॉकीजहून टिकरापारा यादव लोकलपर्यंत हे कपल स्कूटीवर रोमान्स करताना दिसून आले. (girl sitting on boy lap on scooty Couple kissing hugging video trending on social media watch Chhattisgarh viral video)


पोलिसांनी केली कारवाई


हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बिलासपूर वाहतूक पोलिसांनी या स्कूटचालकावर तातडीने कारवाई केली. वाहतूक नियमाचं उल्लघंन आणि बेदरकारपणे गाडी चालवल्यामुळे तरुणाला चालान देण्यात आलं. या तरुणाला 8800 रुपयांचा दंड ठोठवणात आला. त्यानंतर तरुणाने कान पकडून पोलिसांची माफी मागितील.


हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटवर Govinda Prajapati या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. अरे! कोई तो बताओ अब इस प्यार को क्या नाम दिया जाए? असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. 



समाजात वावरताना आजच्या तरुण पिढीने भान बाळगलं पाहिजे. सोशल मीडियाच्या नादात जीवघेणे स्टंट आणि अश्लीलतेचं प्रदर्शन बंद झालं पाहिजे. जरी रात्रीची वेळ असली तरी अशाप्रकारे रस्त्यावर गाडी चालवणे दोघांच्या जीववर बेतलं असतं. एक छोटीशी चूक त्यांना कायम स्वरुपी भोगावी लागली असती. अन् कदाचित त्यांच्यामुळे इतरांनाही...