नवी दिल्ली : इन्स्टाग्रामवर रिल्सचा ट्रेन्ड आला आहे. कधी चॅलेंज तर कधी हटके ट्रेन्ड असे रिल्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 15 सेकंदात चांगला कंटेट देण्याच्या नादात कधीकधी फजितीही होते. कधीकधी हे रिल्स बनवण्याच्या नादात जीवघेणे प्रकार घडतात तर कधीतरी अद्दल घडत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तरुणीसोबत रिल्स काढताना अजब प्रकार घडला. तिची फजिती सोडा पण तिला घडलेली अद्दल ती आयुष्यभर विसरू शकणार नाही. पुन्हा असे रिल्स करताना विचार नक्की करेल. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. 


तरुणी मार डाला गाण्यावर डान्स करत रिल करत होती. यावेळी तिने घोड्याला हात लावला आणि पुढच्या क्षणात घोड्याने तिला हुसकवून लावलं. तरुणी घाबरली आणि दूर पळाली. घोडा तिच्या मागे गेला. 


शांतपणे चरत असलेल्या घोड्याला रिल करत तिने त्रास दिल्यामुळे घोड्याने तिला चांगलीच अद्दल घडवली. ही अद्दल तरुणी आयुष्यभर विसरू शकणार नाही. अनेकांनी या रिलवर मजेशीर कमेंट केली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Bhutni_ke (@bhutni_ke_memes)