पणजी :  भाजपनं (BJP) शिवसेनेच्या (Shivsena) पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी (Aditya Thackeray) केलाय. गोव्यात (Goa Assembly Election 2022) शिवसेनेनं 11 उमेदवार उभे केलेत. त्यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे  गोव्यात आहेत. पणजीमध्ये मनोहर पर्रिकरांचे  पुत्र उत्पल पर्रिकर (Utppal Parrikar) यांच्या अपक्ष उमेदवारीला शिवसेनेनं पाठिंबा दिला आहे. त्यांचाही आदित्य ठाकरेंनी प्रचार केला. (goa assembly election 2022 maharashtra environment minister aditya thackeray critisize bjp)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आदित्य ठाकरे काय म्हणाले? 


"आमची जेव्हा भाजपासोबत युती होती, तेव्हा बाळासाहेब ठाकरेंची ही भावना होती की मित्रपक्ष असेल, तर मैत्री स्वच्छपणे पुढे न्यायला हवी. कुठेही आपल्या मित्राला धोका निर्माण व्हायला नको. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यात लढायचो नाही. गेल्या ५ वर्षांत आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेला. एनडीएमधल्या इतर पक्षांच्या पाठीत देखील खंजीर खुपसला गेला", अशा शब्दात आदित्य ठाकरे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.



दरम्यान गोवा आणि उत्तराखंड या राज्यांसह उत्तर प्रदेशातील दुसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपुष्टात आला. गोव्यात 14 तारखेला  सर्व 40, उत्तराखंडच्या 70 जागांवर मतदान होत आहे.


तर उत्तर प्रदेशातील 55 मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य मतदानयंत्रात बंदिस्त होईल. 1 फेब्रुवारीला निवडणूक आयोगानं सभांवरील बंदी हटवली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी-वाड्रा, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी झंझावाती सभा घेतल्या. 


गोव्यात प्रमोद सावंत आणि उत्तराखंडमध्ये पुष्करसिंह धामी या दोन भाजपच्या मुख्यमंत्र्यांचं भवितव्य सोमवारच्या मतदानात निश्चित होणार आहे.