गोव्यात काँग्रेसचा पराभव, दोन्ही जागा भाजपकडे
गोव्यातील पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी झाले आहेत. तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झालेत.
पणजी : गोव्यातील पणजी मतदारसंघातील पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर विजयी झाले आहेत. तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे वाळपई मतदारसंघातून विजयी झालेत.
मनोहर पर्रीकर ४ हजार ८०३ मतांच्या फरकाने जिंकले. ४० सदस्यीय गोवा विधानसभेत भाजपचे संख्याबळ आता १४ झाले आहे. पणजीत काँग्रेसला ५ हजार ६० मते मिळाली.
पणजी आणि वाळपई मतदारसंघातील पोटनिवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरुवात झाली. दोन तासात निकाल लागला. दोन्ही जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. भाजपतर्फे मुख्यमंत्री पर्रीकर सलग सहाव्यांदा पणजीत विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार गिरीश चोडणकर यांचा पराभव केला. मंत्री विश्वजित यांनी काँग्रेसचे रॉय नाईक यांना पराभूत केले.