Goa Elections Results : गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा भाजप करणार
Goa Elections Result 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीत कोणाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. त्यामुळे येथे त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे.
पणजी : Goa Elections Result 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीत कोणाला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत नाही. त्यामुळे येथे त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपला येथे बहुमत मिळविण्यात यश आलेले नाही. मात्र, असे असले तरी गोव्यात सत्ता स्थापनेचा दावा भाजप करणार आहे. (Bharatiya Janata Party leaders to meet Goa Governor P.S.Sreedharan Pillai today to stake claim for government formation in the Goa)
राज्यात सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते आज गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली आहे. गोव्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये सध्यातरी चुरस दिसत आहे. निवडणूक मतमोजणीत भाजप आघाडीवर दिसून येत आहे. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आतापासून चुसर पाहायला मिळत आहे.
गोव्यात सध्या भाजप 19 जागांवर तर काँग्रेस 12 जागांवर आघाडीवर आहे. मगोप 3, आप 2 जागांवर आघाडीवर आहे. तर अन्य 4 जणही आघाडीवर आहेत. गोव्यात 40 जागांसाठी मतदान झाले असून बहुमतासाठी 21 जागांची गरज आहे. मात्र, हा जादुचा आकडा गाठण्यास कोणालाही यश मिळताना दिसत नाही. त्यामुळे निकालाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर कोणाचे सरकार येणार हे स्पष्ट होणार आहे. मात्र, भाजपने त्याआधीच सत्ता स्थापन करण्याचा दावा करणार आहे.