मुंबई : स्वस्त दरात विमान प्रवास करण्याची खास नवी ऑफर गो एअर या खासगी विमान कंपनीने आणली आहे. या मान्सून सेलअम्ध्ये अवघ्या 1299 रूपयांमध्ये खास विमानप्रवास करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. हा मान्सून सेल तीन दिवसांसाठी असेल. 


कधी करू शकाल तिकीट बुकिंग ?  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 जून ते 30 सप्टेंबर दरम्यान विमान प्रवास करण्यासाठी हा मान्सून सेल खुला राहणार आहे. सोमवार मध्यरात्रीपासून याकरिता तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. 1299 रूपयांच्या या विमान तिकिटामध्ये कर देखील समाविष्ट करण्यात आला आहे. देशभरात 23 ठिकाणांसाठी विमानप्रवासाचं बुकींग करता येणं शक्य आहे.  


तिकीट रद्द केल्यानंतर कर वगळता इतर रक्कम परत मिळणार नाही. प्रवासाचे ठिकाण, अंतर पाहता तिकीटाचे दर वर खाली होऊ शकतात. गो एअरकडून 23 ठिकाणांवर दर आठ्वड्याला सुमारे 1544 विमानं उड्डाण करतात.