नवी दिल्ली : सोनं खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक चांगली बातमी आहे.


लग्नसराईत सोनेखरेदी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नसराईच्या काळात तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच कामाची आहे.


सोन्याच्या मागणीत घट


सोन्याच्या मागणीत घट झाल्याने दरातही कमी झाली आहे. ज्वेलर्सकडून होत असलेल्या कमी मागणीमुळे सोन्याच्या दरात १२ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर ३०,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. 


चांदीचा दरही घसरला


सोन्याच्या दरासोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात ६७५ रुपयांनी घट झाल्याने ३९,३२५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.


व्यापाऱ्यांच्या मते, स्थानिक बाजारातील ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून होणारी मागणी कमी झाल्याने ही घट झाली आहे.


दिल्लीतही मागणीत घट


देशाची राजधानी दिल्लीमध्ये ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या किंमतीत १२० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे हा दर क्रमश: ३०,४०० रुपये आणि ३०,२५० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात २० रुपयांनी किरकोळ घट झाली होती.