सोनं-चांदीच्या दरात घसरण सुरुच
तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे.
नवी दिल्ली : लग्नसराईचा काळ सुरु झाला असून नागरिकांकडून सोनं-चांदी खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोन्याच्या दरात घट झाली आहे.
सोन्याचा दर ३०,००० रुपयांपेक्षाही कमी
सोन्याच्या मागणीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत कमी झाली आहे. म्हणजेच सोन्याचा दर ३०,००० रुपयांपेक्षाही कमी झाला आहे.
मागणी कमी झाल्याने घट
दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पहायला मिळालं. स्थानिक ज्वेलर्सकडून होणारी मागणी कमी झाल्याने सोन्याच्या किंमतीत १५५ रुपयांनी घट झाली आहे.
पाहा किती आहे सोन्याचा दर
सोन्याच्या किंमतीत १५५ रुपयांनी घट झाल्याने सोन्याचा दर २९५१० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे.
गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात वाढ झाली होती. मात्र, आता पून्हा सोन्याच्या दरात घट झाली आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, स्थानिक बाजारात सोन्याची होणारी मागणी आणि कमी झाली आहे त्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.
चांदीचा दरही घसरला
सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात ४८० रुपयांनी घट झाल्याने ३७,८०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.
जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या किंमतीत ०.२२ टक्क्यांची घट होत ते १२५२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले तर चांदीच्या दरात १.०६ टक्क्यांची घट होत ते १५.८० प्रति औंसवर पोहोचले.