सोनं-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या किती महागलं सोनं
सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्वाची आहे. कारण, सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. परदेशातील तेजी आणि स्थानिक बाजारांत ज्वेलर्सकडून होणारी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.
चैत्र नवरात्रीचा सण सुरु आहे. या सणानिमित्त सोनं आणि चांदीच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे.
सोनं महागलं
दिल्लीतील सराफ बाजारात सोन्याच्या दरात ८५ रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ३१,८५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. सोन्याच्या दरात झालेल्या या दरवाढीमुळे सोन्याच्या दराने महिन्याभरातील उच्चांक गाठला आहे.
चांदीही चमकली
एकीकडे सोन्याच्या दरात वाढ झाली असताना चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात ५० रुपयांनी वाढ होत ३९,६०० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्ये सोन्याच्या दरात १.३७ टक्क्यांची वाढ होत ते १,३४६.८० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तर, चांदीचा दर १.१३ टक्क्यांनी वाढून १६.५३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे.