तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ३७५ रुपयांची घसरण
दिल्लीच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्यानंतरही सोन्याच्या दरात ५० रुपयांची घट होत ते प्रति तोळा ३०,४०० रुपयांवर पोहोचले.
नवी दिल्ली : दिल्लीच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्यानंतरही सोन्याच्या दरात ५० रुपयांची घट होत ते प्रति तोळा ३०,४०० रुपयांवर पोहोचले.
यामुळे सोन्याच्या दरात घसरण
व्यापाऱ्यांच्या मते स्थानिक ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडूम मागणी घटल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होतेय. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या किंमतीत सकारात्मक वाढ पाहायला मिळाली.
जागतिक स्तरावर सोन्याच्या दरात वाढ
जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात वाढ होत ते १२८३.२० डॉलर प्रति औंसवर पोहोचले तर चांदीच्या दरात ०.३८ टक्क्यांची वाढ होत ते १२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले.
दिल्लीत हे दर
राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर ५० रुपयांनी घसरुन अनुक्रमे ३०,४०० आणि ३०,२५० रुपये प्रति तोळ्यावर बंद झाले. गेल्या दोन सत्रात सोन्याच्या दरात ३२५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली.