धनत्रयोदशीला उरले फक्त 4 दिवस, आज सोनं स्वस्त की महाग? वाचा 18, 22, 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात घट झाली की वधारलं, हे जाणून घ्या.
Gold Price Today: धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या आधी सोन्या-चांदीच्या दरात घट झाली आहे. दिवाळीत तुम्हाला दागिने खरेदी करण्याची इच्छा आहे का तर आजची संधी तुमच्यासाठी चांगली आहे. सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ झाल्यानंतर आता सोन्याच्या दरात घट झाली आहे. वायदे बाजार ते सराफा बाजारपर्यंत मौल्यवान धातुच्या दरात घट झाली आहे. वायदे बाजारात आज शुक्रवारी 25 ऑक्टोबर रोजी सोनं 258 रुपयांची घट झाली आहे. आज सोनं 78,069 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. काल सोन्याचा दर 78,372 रुपयांवर स्थिरावला होता. चांदीदेखील या दरम्यान 571 रुपयांनी घसरुन 96,461 रुपये प्रतिकिलोग्रॅमवर पोहोचली आहे. काल चांदी 97,035 रुपयांवर स्थिरावली होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 15 डॉलरने वधारुन 2750 डॉलरवर पोहोचले होते. तर, चांदी 34 डॉलरने घसरली होती. त्यामुळं सोन्याचे दर 500 रुपयांपर्यंत महागले होते. व्यापाऱ्यांच्या मागणीमुळं राष्ट्रीय राजधानीमध्ये सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. 99.9 टक्के शुद्ध असलेले सोन्याचे दर 81,500 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या रेकॉर्डब्रेक स्तराने 300 रुपयांची घट होऊन 81,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे.
औद्योगिक कंपन्यांमुळं गुरुवारी चांदीच्या किंमतीत एक हजारांची घट झाली होती. त्यामुळं चांदी काल 1.01 लाख रुपये प्रतिकिलोग्रॅमवर स्थिरावली होती.स्थानिक बाजारात व्यापाऱ्यांची मागणी मंदावल्याने मौल्यवान धातुंच्या किंमतीत घट झाली आहे. तर, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरतेमुळंही सोन्याच्या दरात चढ-उतार होताना दिसत आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 72,950 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 79,580 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 59,690 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 7,295 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 7, 958 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 5, 969 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 58,360 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 63,664 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 59,690 रुपये
मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 72,950 रुपये
24 कॅरेट- 79,580 रुपये
18 कॅरेट- 59,690 रुपये