मुंबई : लॉकडाउन 3 मध्ये सोने-चांदीचा दर कमी झाला आहे. मंगळवारी सोन्याचा भाव 170 रुपयांनी कमी झाला प्रति 10 ग्रॅम 45,453 रुपयांवर आला आहे. चांदी 590 रुपयांनी स्वस्त झाली आहे. याआधी सोमवारी सोन्याचा दर दहा ग्रॅम 180 रुपयांनी वाढून 45913 रुपयांवर गेला होता. सोमवारी चांदी 900 रुपयांनी स्वस्त झाली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटवर, 5 मे 2020 रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 170 ग्रॅमने घसरून 45,743 रुपये झाले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 155 रुपयांनी घसरून 44,040 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. त्याचप्रमाणे चांदी 590 रुपयांनी घसरून 40,710 रुपये प्रतिकिलोवर आली.


विशेष म्हणजे लॉकडाऊनमुळे देशातील बरीच मोठी शहरे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे सोन्याची मागणी कमी आहे. दुसरीकडे, मंगळवारी मार्केटमध्ये सोन्याचा भाव कमी झाला. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध सुरू होण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे सोन्यात आणखी चढउतार होऊ शकतात. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 45,460 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दर प्रति किलो 41,122 रुपयांवर पोहचला आहे.


आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1700 डॉलरच्या वर आहे. कॉमेक्सवर सोने प्रति औंस सुमारे 1705 डॉलर आहे. अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढला आहे, ज्यामुळे सोन्याचा दर कमी झाला आहे.


विशेष म्हणजे 3 मेपासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. परंतु यातही ग्रीन झोनमध्ये सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू केले आहेत. रेड झोनमध्ये केवळ महत्वाच्या गोष्टींची खरेदी-विक्री करता येणार आहे.