नवी दिल्ली : सध्या लग्नसराईचा काळ सुरु झाला असून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.


सोन्याचा दर ३०,००० रुपयांपेक्षा कमी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोन्याच्या किंमतीत घट झाली असून या घटीमुळे सोन्याची किंमत तीन महिन्यांच्या खालच्या पातळीवर पोहोचली आहे. म्हणजेच सोन्याचा दर, ३०,००० रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. 


सोन्याच्या दरात घसरण


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.


पाहा किती आहे सोन्याचा दर 


सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाल्यामुळे सोनं प्रति १० ग्रॅमचा दर ३०,००० रुपयांपेक्षाही कमी झाला आहे. आता १० ग्रॅम सोन्याचा दर २९,९५० रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीचा दरही घसरला 


सोन्याच्या किंमतीसोबतच चांदीच्या दरातही घट झाली आहे. चांदीच्या दरात ३७५ रुपयांनी घट झाल्याने ३८,१२५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली आहे.


व्यापाऱ्यांच्या मते, ही घट म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दराने गेल्या दोन महिन्यांतील निच्चांक गाठला आहे. स्थानिक बाजारपेठ, ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडून होणाऱ्या मागणीत घट झाल्याने हा बदल पहायला मिळत आहे.