सोने आणि चांदीचे भाव वाढले
लागोपाठ दुसऱ्य़ा आठवड्यात सोनं महागलं
नवी दिल्ली : परदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी आज महागली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात लागोपाठी दुसऱ्या आठवड्यात ही वाढ पाहायला मिळाली. सोनं 30 रुपयांनी महागलं आहे. आजचा सोन्याचा भाव 31,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर दुसरीकडे चांदी देखील 650 रुपयांनी महागली असून 38,150 रुपये प्रति किलो झाली आहे.
सण जवळ आल्याने स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढली आहे. दुसरीकडे परदेशात देखील सोनं मजबूत झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,198.70 डॉलर प्रति औंस झालं आहे. तर चांदी 14.25 डॉलर प्रति औंस झाली आहे. सोनं आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढल्याने देखील ही वाढ पाहायला मिळाली आहे.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 99.9 टक्के 99.5 टक्के शुद्ध सोनं अनुक्रमे 31,700 रुपये आणि 31,550 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. दुसरीकडे तयार चांदी देखील 650 रुपयांनी महागली आहे. चांदी 38,150 रुपए प्रति किलो झाली आहे.