लग्नसराईत सोने-चांदीचे भाव वाढले
सोन्या-चांदीचे भाव वाढले
मुंबई : सध्या लग्नसराई आहे. देशभरात सोन्याची मागणी वाढल्याने सोनं महाग झालं आहे. स्थानिक बाजारात सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ पाहायला मिळाली. ऐन लग्नसराईत अनेकांसाठी बॅडन्यूज आहे. सोमवारी दिल्लीमध्ये सोनं 30 रुपयांनी वाढलं. 10 ग्रॅम सोनं 33,000 रुपये झालं.
अखिल भारतीय सर्राफा संघाच्या मते, सोन्याच्या दागिण्यांची मागणी वाढल्य़ामुळे सोन्याचा भाव वाढला. दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. चांदीचा भाव 250 रुपयांनी वाढला असून चांदी 38,700 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये देखील सोनं महागलं आहे. न्यूयॉर्कमध्ये सोनं 1,283.50 डॉलर प्रति औंस झालं आहे.
शनिवारी सोनं 50 रुपयांनी स्वस्त होत 32,970 रुपये प्रति 10 ग्रॅम झालं होतं. दिल्ली सर्राफा बाजारात 99.9 टक्के आणि 99.5 टक्के शुद्ध सोनं 30 रुपयांनी महागलं असून अनुक्रमे 33,000 रुपये आणि 32,830 रुपए प्रति 10 ग्रॅम झालं आहे. चांदीही 250 रुपयांनी महागली असून 38,700 रुपए प्रति किलो झाली आहे.