नवी दिल्ली : तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याच्या तयारीत आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे.


सोन्याच्या दरात घसरण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या मागणीत कमी झाल्याने तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची मागणी कमी झाल्यामुळे सोन्याच्या दरात घट झाली आहे.


पाहा किती आहे प्रति तोळा दर


दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर ३१,३५० रुपयांवर पोहोचला आहे.


चांदीचा दरही घसरला


सोन्याच्या किंमतीत घट झाली असताना चांदीच्या दरातही घसरण झाल्याचं पहायला मिळालं. चांदीच्या दरात ११५ रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ३९,३८५ रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे.


राजधानी दिल्लीत ९९.९ टक्के आणि ९९.५ टक्के शुद्धता असलेल्या सोन्याच्या दरात १०० रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे सोन्याचा दर क्रमश: ३१,३५० रुपये आणि ३१,२०० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.