Gold and Sliver Price Today: यंदाच्या सिझनला गोल्ड आणि सिल्व्हर रेटमध्ये (Today's Gold and Sliver Rates) मोठ्या प्रमाणात चढउतार पाहायला मिळतो आहे त्यातून मध्यंतरी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली होती. तेव्हा सोनं विकण्यावर मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा कल (Gold Price Hike) होता. सोन्याकडे गुंतवणूक या अर्थानंही पाहिलं जातं त्यामुळे यंदा त्यांच्यासाठी चांगला काळ होता असं म्हणायला हरकत नाही. त्यातून लग्नाचा सिझन असल्यानंही सराफा बाजारातील (Gold Price in Wedding Season) दुकानदारांसाठी यंदा चांगला उत्साहही पाहायला मिळाला होता. यंदाच्या परिस्थितीही सोन्याला चांगला भाव लागत असून गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीचे रेट्स (Sliver Rates) हे समाधानकारक आहेत. (Gold and Sliver Price Today gold price shrinks today see the latest updates in wedding season business news in marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

26 फेब्रुवारी रोजी 22 कॅरेटच्या (Standard Gold) 1 ग्रॅम सोन्याच्या दरात 5,243 ची घसरण पाहायला मिळाली होती. तर 8 ग्रॅमच्या सोन्याच्या दरात 41,944 ची घसरण होती. ही किंमत अनुक्रमे 24 फेब्रुवारीला 5,263 किमतीनूसार 20 रूपयांची घसरण झाली. आणि 42,104 रूपये इतक्या किमतीनुसार 160 रूपयांची घसरण झाली होती. तर ही किंमत 24 कॅरेटच्या सोन्यात (Pure Gold) 8 ग्रॅमला 44,040 रूपये अशी किंमत तर 1 ग्रॅमच्या गोल्डला 5,505 रूपये किंमत आहे. 


 


कमोडिटी एक्सचेंजवर काय आहे प्राईझ? 


सोन्याच्या किमतींमध्ये समाधानकारक घसरण दिसते आहे. त्यातून एमसीएक्सच्या कमोडिटी एक्सजेंजमध्ये (Gold and Sliver Price on Commodity Exchange) आज 55 हजारांच्या श्रेणीवर सोन्याचे भाव दिसत आहेत. त्यातून चांदीच्या किमतीत 63 हजारांच्या श्रेणीत घसरण होताना दिसत आहे. यानुसार सोनं हे 3,500 रूपयांनी स्वस्त झाले आहे. 10 ग्रॅमचं सोनं हे 55,360 रूपयांवर घसरले आहे. ही घसरण 0.21 टक्के एवढी आहे. त्यातून चांदी हे 0.45 च्या घसरणीसह 63,636 वर आहे. 


सात दिवसांमध्ये 'ही' आहे परिस्थिती... 


मागच्या सात दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत (Gold Price in Last 7 Days) लक्षणीय घट झाली आहे. त्यातून हे संकेत 22 आणि 24 कॅरेट सोन्यांच्या किमतीच्या दृष्टीनं चांगले आहेत. 22 कॅरेट सोन्यामध्ये 5,310 पासून 5,240 वर उतरतं आहे. 24 कॅरेट सोन्यामध्येही तिचं स्थिती आहे. मागच्या सात दिवसांमध्ये यात मोठी घसरण आहे. साडेपाच हजारावरून हे सोनं त्याच्याही खाली जात आहे. त्यामुळे यंदा लग्नाच्या सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात घट होताना दिसत आहे.