2020 मध्ये सोन्याचा दर गाठू शकतो उच्चांक
सोन्याच्या दरातील गुंतवणूक महत्वाची
मुंबई : सोन्याचा दरात सतत तिसऱ्या दिवशी देखील घसरण पाहायला मिळाली. कमी मागणीमुळे बुधवारी दिल्ली सराफा बाजारात 396 रुपयांनी दरात घसरण झाली असून सोन्याचा दर 40,871 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. काही दिवसांपूर्वी 41,267 रुपये प्रति दहा ग्रॅम दर असा सोन्याचा भाव होता. सोन्याच्या दराप्रमाणेच चांदीच्या दरात देखील घसरण झाली आहे. 179 रुपयांनी चांदीचा दर कमी झाला असून 46,881 रुपये प्रति किलोग्रॅम असा आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत चढ-उतार पाहायला मिळत आहे.
सोन्यातील ही घसरण गुंतवणूक दारांसाठी चांगलीच संधी आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, यावर्षी सोन्यामध्ये गुतंवणूक करणं सर्वाधिक फायदेशीर ठरणार आहे. तज्ञांच्या माहितीनुसार, यावर्षी सोन्याचा दर 45 हजार रुपये प्रति असा होणार आहे. सोन्याचा दर पाहता कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला एक्सपर्ट देत आहेत.
ई-गोल्डमध्ये करा गुंतवणूक
गोल्डच्या भविष्यातील गुंतवणूकीचा विचार करता तज्ञांनी अनेक सल्ले दिले आहेत. तज्ञांच्या माहितीनुसार इलेक्ट्रिक गोल्ड सारखे ईटीएप (Gold ETF), गोल्ड बॉन्ड (Gold Bond) आणि गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutul Fund) मध्ये गुंतवणूकीचे सल्ले दिले आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, ई गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी एका वर्षात तुम्हाला चांगले रिटर्न मिळतात. तसेच ई-गोल्डमध्ये सोन्याची डायरेक्ट खरेदी करू शकता. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे हे सोनं सांभाळण्याची झंझट राहत नाही.