Gold | गेल्या दिवाळीपेक्षा 6 टक्क्यांनी स्वस्त झालं सोनं; गुंतवणूकीसाठी सध्या सुवर्णसंधी
दिवाळीआधी सोन्याच्या भावात तेजी दिसून येत आहे. MCX वर सोन्याच्या भावाने आज उसळी घेतली आहे.
मुंबई : या दिवाळीच्या आधी सोन्यामध्ये तेजी दिसून येत आहे. MCX वर सोने मजबूत होऊन 47935 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास ट्रेड करीत आहे. ग्लोबल इन्फ्लेशनची भीती, क्रुडच्या वाढत्या किंमती, इक्विटीच्या हाय वॅल्युएशन आणि पावर क्राइसिससारखे फॅक्टर सोन्याच्या किंमतींना सपोर्ट देत आहे. सोन्यात तेजी दिसून येत असली तरी, सोन्याच्या भावात मागील वर्षीच्या दिवाळीपेक्षा 6 टक्क्यांनी घसरण झाली आहे. एक्सपर्टचे म्हणणे आहे की, ज्या प्रकारचे फॅक्टर बाजारात तयार झाले आहेत तसेच फिजिकल डिमांड तयार झाले आहे. त्याचप्रमाणे पुढे सोन्यात तेजी दिसून येऊ शकते.
दिवाळीपर्यंत स्ट्रॅटजी
IIFL सेक्युरिटीजच्या VP अनुज गुप्ता यांचे म्हणणे आहे की, टेक्निकल चार्टवर शॉर्टटर्ममध्ये तेजी आलेली दिसून येत आहे. दिवाळीपर्यंत सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी सध्याच्या 47500 रुपये प्रतितोळ्याच्या भावावर खरेदी करायला हवी. भारतीय बाजारांसाठी सोन्याच्या दरांमध्ये 50 हजाराचा रेजिस्टंस दिसून येत आहे.
तसेच चांदीमध्ये गुप्ता यांनी 64000 रुपये प्रति किलोच्या भावावर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. चांदीसाठी शॉर्टटर्मसाठी 68000 रुपये तर दीर्घ गुंतवणूकीसाठी 70 हजाराचे टार्गेट निश्चित कऱण्यात आले आहेत.
एक्सपर्टचा सल्ला
केडिया कमो़डिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांचे म्हणणे आहे की, कोरोना काळानंतर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था सुधारण्याच्या प्रयत्नात आहे. आयएमएफनेदेखील अर्थव्यवस्था सुधाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच फिजिकल सोन्याची मागणी देखील वाढली आहे. डॉल्फ इंडेक्समध्ये देखील दबाव दिसून आला आहे. कमी कालावधीच्या गुंतवणूकीसाठी त्यांनी 50 हजार रुपये प्रति तोळे इतके टार्गेट दिले आहे.