मुंबई : (Gold Hallmarking Latest News Update) देशात आजपासून म्हणजेच 16 जूनपासून सोनं विक्री करताना गोल्ड हॉलमार्किंग म्हणजेच सोनं शुद्धता प्रमाणपत्र अनिवार्य असेल असे सांगितले गेले होते परंतु गोल्ड हॉलमार्किंगचे नियम देशभरात एकाच वेळी लागू होणार नाहीत, कारण सोन्याच्या व्यापारांनी सरकारला सांगितले की, ते अद्याप याची अंमलबजावणी करण्यास पूर्णपणे तयार नाहीत. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणा-यांसाठी लागू असेल. मात्र ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात.


काय असतं हॉलमार्क?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोने, चांदी आणि प्लॅनिटमच्या धातुंचे शुद्धतेचे प्रमाण म्हणजे हॉलमार्क. हे विश्वसनीय असल्याचे माध्यम आहे. हॉलमार्कची ही प्रक्रिया पूर्ण देशात उपलब्ध आहे. ही प्रक्रिया भारताच्या ब्यूरोमार्फत म्हणजे BIS मार्फत होणार आहे. 


मंगळवारी 15 जूनला संध्याकाळी वाणिज्य आणि ग्राहक व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत ज्वेलर्सची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.


त्यामध्ये एक असा निर्णय घेण्यात आला की, एकाचवेळी  Gold Hallmarking ची वेळी अंमलबजावणी केली जाणार नाही, वेगवेगळ्या टप्प्यात याची अंमलबजावणी केली जाईल. दुसरे म्हणजे, छोट्या दागिन्यांच्या व्यापाऱ्यांना सोन्याच्या हॉलमार्किंगच्या कक्षेतून दूर ठेवले गेले आहे, ज्यामुळे छोट्या व्यापारांनी याचा मोठा दिलासा मिळाला आहे.


पीयूष गोयल यांनी बैठकीत जाहीर केले की, पहिल्या टप्प्यात म्हणजेच 16 जूनपासून देशातील 256 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच ज्या जिल्ह्यात हॉलमार्किंग सेंटर आहे अशा जिल्ह्यात हॉलमार्किंगची अंमलबजावणी केली.


सर्व दागिने व्यापाऱ्यांना त्यांच्याकडे असलेल्या जुन्या स्टॉकवर हॉलमार्किंगसाठी वेळ देत सरकारने 2 महिने म्हणजे 1 सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तोपर्यंत त्यांना जुन्या स्टॉकवर हॉलमार्किंग करावे लागेल. या कालावधीत कोणत्याही व्यापाऱ्यावर दंड अथवा दंडात्मक कारवाई केली जाणार नाही.


सर्व दागिने विक्रेत्यांना वन टाईम नोंदणी करावी लागेल, ज्याचे नूतनीकरण करण्याची देखील आवश्यकता नाही आणि ते अगदी विनामूल्य देखील असेल.


याशिवाय कुंदन, पोल्कीचे दागिने आणि घड्याळ यांसारख्या वस्तू हॉलमार्किंगच्या कक्षेतून राहतील. म्हणजेच याला  हॉलमार्किंग करण्याची गरज नाही. तसेच 40 लाखांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या व्यापारी हॉलमार्किंगच्या नियमांच्या कक्षेत नसतील. म्हणजेच सरकारने छोट्या ज्वेलर्सना मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्यावर ऑगस्ट अखेरपर्यंत हॉलमार्किंगच्या नियमांबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. (Gold Hallmarking Latest News Update)


यासह 14, 18, 22 व्यतिरिक्त सरकारने 20, 23, 24 कॅरेट दागिन्यांच्या हॉलमार्किंगलाही मान्यता दिली आहे.(Gold Hallmarking Latest News Update)


या बैठकीत अन्य व्यापारी नेत्यांव्यतिरिक्त, ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे (CAIT) राष्ट्रीय सचिव आणि ऑल इंडिया ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय संयोजक (AIJGF) देखील सहभागी झाले. AIJGF ही देशातील लहान ज्वेलर्सची सर्वात मोठी संघटना आहे. CAIT चे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भारतीय आणि सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.