नवी दिल्ली : सोनं खरेदीत फसवणूक करणं आता अशक्य आहे. केंद्र सरकार पुढच्या वर्षापासून एक नियम लागू करणार आहे. ज्यामुळे तुम्हाला १०० टक्के शुद्ध सोनं मिळेल. सध्या सोनं-चांदीची शुद्धता मोजण्याचे काही मापन नाहीय. त्यामुळे अनेकदा ग्राहकांची फसवणूक होत असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


१ जुलै २०२१ पासून नियम लागू 


सोन्याच्या आभूषणांवर हॉलमार्किंग १ जुलै २०२१ पासून लागू होणार आहे. आधी हा नियम १५ जानेवारी २०२१ पासून लागू होणार होता. पण ज्वेलर्सनी BIS अंतर्गत एका वेळेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक होते पण ते झाले नाही. सरकारने डेडलाईन वाढवावी अशी मागणी ज्वेलर्सनी केली. इतक्या कमी वेळात स्टॉक लिक्विडेट करणं सोपं नव्हतं. यासाठी साधारण एक वर्षांच्या अवधीची गरज असल्याचे ज्वेलर्स म्हणाले. 


नव्या नियमांनुसार २२ कॅरेटचे सोने सांगून १८ कॅरेटचे सोने विकणाऱ्या ज्वेलर्सना दंड आणि तुरुंगवास होऊ शकतो. देशात हॉलमार्कींग केंद्राची संख्या वेळेनुसार वाढवली जाणार आहे. या वेळेस देशात ९०० च्या आसपास हॉलमार्कींग केंद्र आहेत, जे आणखी वाढवले जातील.