नवी दिल्ली : गोल्ड हॉलमार्किंगच्या मुद्द्यांवर शनिवारी BIS ने सरकारची बाजू मांडली. बीआयएसच्या डायरेक्टर जनरलने म्हटले की, हॉलमार्किंग प्रक्रिया लागू झाल्यानंतर ज्वेलर्सचे रजिस्ट्रेशन दररोज वाढत आहे. हॉलमार्किंग प्रक्रिया लागू केली त्यावेळी 35 हजार ज्वेलर्स रजिस्टर झाले होते. आज 91 हजार 603 ज्वेलर्स रजिस्टर आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हॉलमार्किंग स्किमला ज्वेलर्सचे पूर्ण समर्थन
BISने सरकारची बाजू मांडताना सांगितले की, देशात सध्या 860 हॉलमार्किंग सेंटर्स आहेत. 1 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत या सेटर्सला 1 कोटी 17 लाख ज्वेलरी युनिट हॉलमार्कसाठी मिळाले आहेत. त्यातील 1 कोटी 2 लाख ज्वेलरी हॉलमार्क करण्यात आली आहे. BISच्या मते हॉलमार्क स्किमला ज्वेलर्सचे पूर्ण समर्थन मिळत आहे.


1-15 जुलै दरम्यान, 1 दिवसात 3 कोटी 90 लाख ज्वेलरी हॉलमार्क
1 जुलै ते 15 जुलै दरम्यान, सेंटर्सला 14 लाख 28 हजार ज्वेलरी पीस हॉलमार्क मिळाले होते. आज स्थिती ही आहे की, 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान 41 लाख 81 हजार पीस हॉलमार्कसाठी मिळाले आहेत.


BIS च्या डीजी यांनी म्हटले की, सर्वात मोठे आव्हान सर्व सेंटरच्या क्षमतेबाबत होता. 860 सेंटर्समध्ये फक्त 160 सेंटर्स 500 हून जास्त ज्वेलरी हॉलमार्क करतात. उर्वरित 529 सेंटर्स दिवसात सरासरी 100 ज्वेलरी हॉलमार्क करतात.