Gold Loan: सणा सुदीच्या दिवशी थोडे का होईना पण सोने खरेदी करण्याची आपल्याकडे प्रथा आहे. मुहुर्तावर केलेली सोने खरेदी आपल्याकडे शुभ मानली जाते. भारतातील असंख्य लोक भरपूर सोने खरेदी करतात. देशातही परंपरेने सोने खरेदी केले जाते आणि लोक सण-उत्सवातही सोने खरेदी करतात. याशिवाय देशात लग्नसमारंभातही भरपूर सोने दिले जाते. अशावेळी अनेकांच्या घरी बरेच सोने पडलेले असते. आता घरी पडून असलेल्या सोन्यावरही पैसा उभा करणे शक्य आहे, असे तुम्हाला कोणी सांगितले तर विश्वास बसेल का? हो. आपण या संपूर्ण प्रक्रियेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी कधी लोकांना अचानक पैशांची गरज लागते. अशावेळी लोक कर्जही घेतात. कर्जाचे विविध प्रकार आहेत आणि लोक त्यांच्या गरजेनुसार कर्जासाठी अर्ज करू शकतात. लोकांना हवे असेल तर ते गोल्ड लोनही मिळवू शकतात. जर लोकांकडे सोने असेल तर ते सोने बॅंकेत गहाण ठेवून त्यांना ठराविक इंट्रेस्ट रेटसह हवी तेवढी रक्कम मिळवू शकता. 


कर्नाटक बँक


लोकांची अचानक पैशांची गरज ओळखून कर्नाटक बँकेने गोल्ड लोनसाठी डोअर-स्टेप सुविधा सुरू केली आहे. कर्नाटक बँकेने 'केबीएल-स्वर्ण बंधू' या नावाने डोअर-स्टेप गोल्ड लोन सुविधा सुरू केली आहेएंड-टू-एंड डिजिटलायझेशनसह गोल्ड लोनसाठी हे अद्वितीय प्रोडक्ट असल्याचे बॅंकेच्या वतीने सांगण्यात आले आहे. याद्वारे बँक ग्राहकांच्या दारात सुवर्ण कर्ज सेवा देऊ शकणार आहे.


सोने कर्ज


ही सुविधा बँकेने अद्याप सर्व केंद्रांवर उपलब्ध करून दिलेली नाही. सुरुवातीला ही सुविधा बँकेच्या निवडक केंद्रांमध्ये ग्राहकांना उपलब्ध असेल. हळूहळू बँकेच्या सर्व शाखांमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाईल. देशातील सोन्याशी संबंधित प्रचंड बाजारपेठ लक्षात घेऊन कर्नाटक बँकेने हा निर्णय घेतला आहे.


डोअर-स्टेप गोल्ड लोन


घरोघरी सुवर्ण कर्ज सुविधा पोहोचवण्यासाठी कर्नाटक बँकेने मणिपाल समूहाच्या सहकार्याने ही सुविधा आणली आहे. तसेच यासाठी सोन्याच्या कर्जासाठी एकत्रित व्यासपीठ असलेल्या साहिबंधूसोबत भागीदारी केली आहे. साहिबंधु कॉर्पोरेट व्यवसाय वार्ताहर आणि कर्ज सेवा प्रदाता म्हणून काम करतील. बँकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या या सुविधेमुळे ग्राहकांच्या दारात सोने कर्ज उपलब्ध करून देण्यात मदत होणार आहे.