Gold Price Today: मागील आठवड्यात सोन्याच्या दरात किंचित घसरण होत होती. मात्र आता सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मौल्यवान धातुला झळाळी आली आहे. सोन्यासोबतच चांदीच्या दरातही उसळी आली आहे. आज सोनं तब्बल 550 रुपयानी वधारलं आहे. त्यामुळं आज MCXवर 24 कॅरेट प्रतितोळा सोन्याचा भाव 73,200 रुपये इतका आहे. चांदीच्या दरात आज 153 रुपयांची वाढ झाली आहे. आज चांदी 84,883 रुपयांवर ट्रेड करतेय. सोनं पुन्हा एकदा 75 हजारांवर पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जागतिक संकेतांनुसार, सोन्याच्या किमतीत गेल्या एका महिन्यात सर्वाधिक एक दिवसीय वाढ नोंदवली गेली. स्थानिक सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा भाव 1,400 रुपयांनी वाढून 74,150 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. शुक्रवारी शेवटच्या व्यवहारात सोने 72,750 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. चांदीचा भावही 3,150 रुपयांनी वाढून 87,150 रुपये प्रति किलोवर बंद झाला, तर त्याची पूर्वीची किंमत 84,000 रुपये प्रति किलो होती.


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  67,710  रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  73,200 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  54,900 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   6, 710 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7, 320 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 490 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   53, 680 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   58, 560 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    43, 920 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 67,100  रुपये
24 कॅरेट- 73,200 रुपये
18 कॅरेट- 54, 900 रुपये