सोन्याचे भाव सलग तिसऱ्या दिवशी घसरले
सोन्याचे भाव घसरले
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजाराता आणि स्थानिक बाजारातून सोन्याच्या कमी मागमीमुळे सराफा बाजारात सोनं मंगळवारी तिसऱ्या दिवशी देखील खाली घसरलं. सोन्य़ाचा भाव 105 रुपयांनी घसरला आहे. 31,860 रुपये प्रति 10 ग्रॅम सोनं झालं आहे. चांदी मात्र 70 रुपयांनी वाढून 40,900 रुपये प्रति किलो झालं आहे.
अमेरिका-उत्तर कोरिया यांच्यामध्ये चर्चा होणाऱ असल्याची चर्चा आहे. ज्यामुळे गुंतवणुकीत सुरक्षित विकल्पामुळे सोन्याचे भाव कमी झाले आहेत. सिंगापूरमध्ये सोनं 0.08 टक्के कमी झालं असून 1,296.20 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. तर चांदी 0.58 टक्के कमी झाल्याने 16.34 डॉलर प्रति औंस झाली आहे. स्थानिक बाजारातून देखील मागणी कमी झाल्याने भाव कमी झाले आहेत.