सोन्याचे भाव घसरताय? असाच ट्रेंड कायम राहिल्यास इतके रुपये तोळा सोनं मिळणार
भारतातील वाणिज्यीक घडामोडींचा सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो
मुंबई : देशात कोरोनाच्या लाटेने थैमान घातलं आहे. देशातील आरोग्य व्यवस्था अपूऱ्या पडायला लागल्या आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय समुदायाकडून भारताला आरोग्यविषयक मदतीच्या खेपा सुरू झाल्या आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवरही होत असतो.
भारतातील वाणिज्यीक घडामोडींचा सोन्याच्या भावावर परिणाम होत असतो. आज मल्टी कोमोडिटी एक्स्चेंज MCXमध्ये सोन्याचा भाव दुपारी 12 वाजेपर्यंत 47 हजार 177 प्रतितोळे इतका सुरू होता.
त्याचप्रमाणे मुंबईतील चांदीच्या किंमतीत काल 1000 रुपयांनी घसरण झाली होती. परंतु आज पुन्हा चांदीच्या किंमतीत 800 रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबईत आज चांदीचा भाव 68,600 प्रति किलो इतका आहे.
MCX मार्केटमध्ये दुपारी 12 वाजेपर्यंत चांदीचा भाव 69723 इतका होता.
मुंबईती सोन्याच्या भावात आज घसरण नोंदवली गेली आहे. त्यामुळे हा ट्रेंड कायम राहिल्यास गेल्या तीन महिन्यातील सोन्याचा निच्चांकी भाव म्हणजे 43 हजार 700 वर जाण्याची शक्तता आहे.
मुंबईतील सोन्याचा आजचा भाव
22 कॅरेट 44,480 प्रतितोळे
24 कॅरेट 45,480 प्रतितोळे
कालचा मुंबईतील सोन्याचा भाव (28 एप्रिल)
22 कॅरेट 44,790 प्रतितोळा
24 कॅरेट 45,790 प्रतितोळा
-------------------
वरील सोने - चांदीचे भाव जीएसटी आणि अन्य टॅक्स वगळून दिले आहेत, स्थानिक ज्वेलर्सप्रमाणे यात बदल होऊ शकतो.)