Gold Rate Today: आज देशात पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं ग्राहकांच्या चिंतेत पुन्हा वाढ झाली असल्याचे पाहायला मिळतेय. आठवड्यातील दोन दिवस सोन्याचे दर कमी झाले होते. मात्र आज पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. (Gold Rate Today In Marathi)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 77,450 रुपयांवर पोहोचलं आहे. त्याचबरोबर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 100 रुपयांनी वाढ होऊन प्रतितोळा सोनं 71,000 रुपयांवर स्थिरावलं आहे. त्याचबरोबर 18 कॅरेट सोन्याच्या दरात 80 रुपयांची वाढ झाली असून 58,090 रुपयांवर प्रतितोळा सोनं स्थिरावलं आहे. डिसेंबर महिना सुरू झाल्यानंतर लग्नसमारंभाना सुरुवात होते. मेपर्यंत लग्नांचा सीझन असतो. त्यामुळं या महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांची मागणी वाढते. लग्नात वधुला सर्वाधिक दागिने घालण्यात येतात. त्यामुळं वधुकडील पक्षाला दागिने खरेदीची अधिक लगबग असते. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71,000 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,450 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,090 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,100 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,745 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 809 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   56,800 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   61,960 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    46,472 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 71,000 रुपये
24 कॅरेट  77,450 रुपये
18 कॅरेट-58,090 रुपये