Gold Rate Today: कमोडिटी बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाल्याच चित्र आहे. या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी असल्याचे पाहायला मिळतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोनं 76,000 हजारांच्या पार पोहोचले आहे. तर, MCXवर चांदी 89,500 रुपयांच्या वर पोहोचली होती. सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ नोंद झाली आहे. तर, चांदीलादेखील झळाळी आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 2,650 जवळपास होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास MCX वर सोनं 280 रुपयांच्या तेजीसह 77,730 रुपये प्रतितोळा ट्रेड करत आहे. तर चांदी 322 रुपयांनी वाढून 89,648 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. मंगळवारी मात्र चांदी 89,326 रुपयांवर व्यवहार बंद झाला होता. सुट्ट्यामुळं सोन्याच्या किंमती स्थिर होत्या तर मागील आठवड्यात घसरणीनंतर आता पुन्हा एकदा सोनं वधारलं आहे. 


आज 24 कॅरेट सोन्याच्या दरात 280 रुपयांची वाढ झाली असून सोनं प्रतितोळा 77,730 रुपयांवर स्थिरावले आहे. 22 कॅरेट सोन्याच्या दरात 250 रुपयांची वाढ झाली असून 71,250 रुपयांवर स्थिरावली आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 210 रुपयांनी वाढवली आहे मात्र 58,300 रुपयांवर स्थिरावली आहे. 


आज काय आहेत सोन्याचे भाव?


ग्रॅम              सोनं           किंमत
10 ग्रॅम     22 कॅरेट  71,250 रुपये
10 ग्रॅम     24 कॅरेट  77,730 रुपये
 10 ग्रॅम    18 कॅरेट  58,300 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
1 ग्रॅम     22 कॅरेट   7,125 रुपये
1 ग्रॅम     24 कॅरेट   7,773 रुपये
1 ग्रॅम    18 कॅरेट    5, 830 रुपये


ग्रॅम              सोनं           किंमत
8 ग्रॅम     22 कॅरेट   57,000 रुपये
8 ग्रॅम     24 कॅरेट   62,184 रुपये
8 ग्रॅम    18 कॅरेट    58,300 रुपये


मुंबई - पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?


22 कॅरेट- 71,250 रुपये
24 कॅरेट   77,730 रुपये
18 कॅरेट- 58,300 रुपये