दुसऱ्या दिवशीही सोनं स्वस्त, पाहा काय आहेत आजचे भाव
आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि विक्रेत्यांच्या घटलेल्या मागणीमुळे सोन्याचे दर दुसऱ्या दिवशीही स्वस्त झाले आहेत.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील कमजोरी आणि विक्रेत्यांच्या घटलेल्या मागणीमुळे सोन्याचे दर दुसऱ्या दिवशीही स्वस्त झाले आहेत. सोन्याचे भाव ५० रुपयांनी कमी होऊन ३०,८४० रुपये प्रती १० ग्रॅम झाला आहे. सोन्याचे भाव कमी झाले असले तरी चांदीची किंमत ५ रुपयांनी वाढून ३९,३२५ रुपये प्रती किलो झाली आहे. डॉलर मजबूत झाल्यामुळे तसचं आरबीआयकडून व्याजदरांमध्ये वाढीची शक्यता असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कमजोरी आल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातली सोनं पडलं
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचे दर पडलेले पाहायला मिळत आहेत. सिंगापूरमध्ये सोन्याचे दर ०.२७ टक्क्यांनी कमी होऊन १,२२०.७० डॉलर प्रती आउन्स झाले आहेत. तर चांदीचा भाव ०.१० टक्क्यांनी कमी होऊन १५.३२ डॉलर प्रती आऊन्स आहे.
दिल्लीमध्ये ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ३०,८४० आणि ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचे भाव ३०,६९० रुपये प्रती तोळा आहेत. आज ५० रुपयांची घट व्हायच्या आधी काल सोन्याचे भाव ८० रुपयांनी पडले होते.